TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2021 – महाराष्ट्राचे राज्यपाल नियबाह्य काम करत आहेत. या राज्यपालांमुळे राष्ट्राला आणि संविधानाला धोका आहे. राष्ट्रपतींनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू केली. ते सध्या दिल्लीमध्ये असून त्यांनी हे विधान केलं आहे.

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्दा अजून अधांतरी आहे. यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात वारंवार टीका होतेय. यावर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय. राज्यपाल नियमबाह्य काम करत असतात. त्यात राष्ट्रपतींनी लक्ष घालावे, असे बच्चू कडू यांनी म्हटलं.

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केलीय. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना हे बोलाव लागेल. मी विरोधी पक्षनेता आहे हे सांगावच लागतं, असा टोला त्यांनी हाणला.

मंदिर उघडण्याच्या भाजपच्या मागणीवर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. मंदिर आणि शाळा उद्यापासून उघडाव्यात, असे मलाही वाटतं. पण, मंदिरं जाणीवपूर्वक बंद ठेवले नाहीत. आर्थिक कोंडी होतेय हे मान्य आहे. पण, करोनाला थांबवण्यासाठी हे गरजेचं आहे, असेही त्यांनी सांगितलं.