टिओडी मराठी, पुणे, 1 सप्टेंबर 2021 – भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी विरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशाप्रकारे व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस संगीता तिवारी यांनी फिर्याद दिलीय.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री पायल रोहतगी हिने पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहेत, याचे व्हिडीओ व्हायरल झालेत. संबंधित व्हिडीओमध्ये रोहतगी हिने ट्रिपल तलाक कायद्याला काँग्रेस कुटुंब पूर्णतः विरोध करीत आहेत, असे म्हटले.आहे. त्याशिवाय तिने गांधी कुटुंबियांसह अनेकांविरूद्ध आक्षेपार्ह विधान केल्याचे आढळले आहे. याप्रकरणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी तक्रार दिली होती.
रोहतगीने अॅपचा वापर करुन एक व्हिडीओ बनवून राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी चुकीचे विधान केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
ससमाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी संबंधित अभिनेत्री विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती तपास अधिकारी यु. के. माने यांनी दिलीय.
अभिनेत्री पायल रोहतगी हिने देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहलाल नेहरू यांच्यासह गांधी कुटुंबियांबद्दल अतिशय खालच्या शब्दात वक्त्यव्य केलं आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चौकशीनंतर संबंधित अभिनेत्रीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी म्हंटले आहे.