LIC मध्ये झालाय ‘हा’ बदल; उद्यापासून लागू होणार ‘हे’ नवे नियम

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळखणाऱ्या LIC मध्ये एक मोठा बदल होणार असून हे नवे नियम सोमवार (दि. 10 मे) पासून लागू होणार आहेत. LIC कडून अशी माहिती दिली आहे.

LIC कडून असे सांगण्यात आली आहे कि, सोमवार, दि. 10 मे पासून त्यांची सर्व कार्यालयं आठवड्यातून पाच दिवस काम करतील. शनिवारी हि आता LIC मध्ये साप्ताहिक सुट्टी असणार आहे. कंपनीने एका सार्वजनिक नोटीसमध्ये असं म्हटलं आहे. 15 एप्रिल रोजी जारी केलेल्या सरकारच्या अधिसुचनेनुसार विमा कंपनीसाठी शनिवार हि साप्ताहिक सुट्टी जाहीर केली आहे.

LIC ने एक अधिकृत नोटीस जारी करत या निर्णयाबाबत सूचना दिलीय. या नवीन वर्क कल्चरनुसार सोमवार (दि. 10 मे) पासून LIC ऑफिस आठवड्यातील पाच दिवस, सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

LIC कडून त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सुविधा हि पुरवली जात आहे. तुम्ही https://licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर कामं पूर्ण करू शकता. याशिवाय एलआयसीने कोरोना काळात ग्राहकांची असुविधा लक्षात घेता क्लेम्स संदर्भातील अटी शिथील केल्या आहेत.

LIC च्या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार :
यासह LIC च्या कर्मचाऱ्यांना लवकर पगारवाढ मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाने वेतन संशोधन बिलला मंजुरी दिलीय. या सुधारणेमुळे एक लाखापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विधेयकात 16 टक्के वाढ नमुद केलं आहे. अहवालात हे हि नमुद केलं आहे की एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना एक विशेष भत्ता देखील दिला जाणार आहे.

Please follow and like us: