जगातील सर्वात लांब पापण्याची महिला!; Guinness Book of Records मध्ये नोंदवलं नाव, फोटो होतोय Viral

टिओडी मराठी, दि. 14 जून 2021 – सध्या सोशल मीडियावर जगातील सर्वात लांब पापण्या असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल होत आहेत. या महिलेच्या पापण्या इतक्या मोठय़ा आहेत की चक्क त्यांची वेणी घालावी लागत आहे. ऐकावं ते अजब असं यावरून अनेकांना वाटत आहे.

चीनमधील यू या महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. 2016 मध्ये तिच्या पापण्या 4.88 इंच लांब होत्या. मात्र, आता तिने स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे.

आता तिच्या पापण्या 20.5 इंच लांब झाल्यात. तिची अशी अवस्था का आहे?, याचा तपास अद्याप डॉक्टरही लावू शकलेले नाहीत. तिच्या पापण्या गालाच्या खालीपर्यंत पोहोचल्यात.

याबाबत ती म्हणाली की, माझ्या पापण्या अगोदर इतक्या लांब नव्हत्या. 2015 मध्ये मी डोंगराळ भागात दीड वर्ष राहिली आहे. तिथून परतल्यानंतर माझ्या पापण्या अत्यंत वेगानं वाढू लागल्यात. या पापण्यांमुळे तिच्यातील शक्ती आणखी वाढली आहे, असे तिला वाटत आहे.

Please follow and like us: