मुंबई: ठाकरे सरकारच्या सगळ्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. पंचनाम्याआधी मदत करा. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्यापासून (ता.२) भाजप नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर दौऱ्यावर आहेत.
राज्य सरकारच्या घोषणा हवेत विरल्या, कोणत्याच पुरग्रस्तांना मदत मिळाली नाही. पुरग्रस्त मराठवाड्यात पंचनामे सुरू करण्याआधी मदत करण्याची गरज आहे. सगळ्या घोषणा केवळ कागदावरच, पंचनाम्याआधी मदत करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
पूरग्रस्त भागाचा आपण दौरा करणार असून त्यानंतर नेमक्या स्थितीवर बोलेन.
मात्र आज राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे, हा दिलासा जनतेला मिळाला पाहिजे. पूर्वीच्या कोणत्याही संकटातील मदत अजून गरजूंना मिळालेली नाही. सरकारच्या घोषणा आणि प्रत्यक्ष मदत यात मोठे अंतर आहे.https://t.co/hjt8OggcsB pic.twitter.com/0odj8cj1Qd— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2021
महाराष्ट्रातील मराठवाड्यात पूरपरिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे.