TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 सप्टेंबर 2021 – राज्यातल्या शिक्षण विभागामध्ये एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. यात शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केली आहे.

मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हंटलं की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”

राज्यात सद्यस्थितीत एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहे.