TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 मे 2021 – प्रवाशांच्या संख्येत सतत होणारी घट आणि कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने काही विशेष गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवास करण्यापूर्वी एकदा या गाड्यांची यादी तपासणी करावी, असे पूर्व मध्य रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ज्यांनी रेल्वेचे तिकीट बुक केलं असेल तर ते तपासून पहा.

तर भारतीय रेल्वेने 21 गाड्या रद्द केल्या आहेत. ह्या रेल्वे बिहार मार्गावर धावत होत्या. या दरम्यान, पुढील आदेशापर्यंत या गाड्या 25 मेपासून रद्द केल्या आहेत. त्यामुळे आज प्रवास करण्यापूर्वी तुमच्या ट्रेनचे स्टेटस काळजीपूर्वक तपासावे, जेणेकरून स्टेशनवर पोहोचल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही.

पूर्व मध्य रेल्वेच्या वतीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या रेल्वेगाड्या पाटणा, भभुआ, राजेंद्र नगर टर्मिनल, सीलदार, दानापूर, सिकंदराबाद, सहरसा अशा अनेक मार्गांवर चालविल्या जात आहेत.

25 मे 2021 पासून रद्द केलेल्या रेल्वेगाड्या..:

03249 पाटणा-भभुआ रोड इंटरसिटी स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

03250 भभुआ रोड-पाटणा इंटरसिटी स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

03259 पाटणा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन 26 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

03260 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पाटणा विशेष ट्रेन 28 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

03253 पाटणा-बनसवाडी विशेष ट्रेन 27 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

03254 बनासवाडी ते पाटणा विशेष ट्रेन 30 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

03242 राजेंद्रनगर टर्मिनल-बांका विशेष रेल्वेगाडी 25 मेपासून पुढील आदेशपर्यंत रद्द.

03241 बांका-राजेंद्रनगर टर्मिनल विशेष ट्रेन 26 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

03642 पंडित दीन दयाल उपाध्याय जम्मू-दिलदारनगर पॅसेंजर स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

03641 दिलदारनगर- पंडित दीन दयाल उपाध्याय जं. पॅसेंजर 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

03643 दिलदारनगर-तारीघाट पॅसेंजर विशेष ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

03644 तारीघाट- दिलदारनगर पॅसेंजर स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

03647 दिलदारनगर- तारिघाट पॅसेंजर स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

03648 तारीघाट- दिलदारनगर पॅसेंजर विशेष ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

या गाड्याही रद्द केल्या आहेत :
03169 सियालदह – सहरसा विशेष ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
03170 सहरसा – सियालदह विशेष ट्रेन 26 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
03163 सियालदह -सहरसा विशेष रेल्वेगाडी 23 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
03164 सहरसा – सियालदह विशेष गाडी 24 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
03160- सहरसा-सियालदह विशेष ट्रेन (भाया पूर्णिया) 26 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
07052- दानापुर सिकंदराबाद 25 मे रोजी रद्द