टिओडी मराठी, काबूल, 31 ऑगस्ट 2021 – ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आपले बचाव कार्य सुरू ठेवणार आहे. त्याअगोदर राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सलमी कारवान परिसरामध्ये एक दिवस आधीच सोमवारी सकाळी रॉकेट हल्ला झाला होता, अशी माहिती मिळत आहे.
काबूलच्या सलीम स्फोटानंतर गोळीबार देखील झाला होता. पण, हा हल्ला आणि गोळीबार कोणी केला?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काबूल विमानतळाच्या वायव्य भागामध्ये रविवारी दुपारी हि रॉकेट हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये तीन मुले ठार झाली होती, असे अफगाणी अधिकाऱ्याने सांगितले.
३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य माघारी घेण्याच्या घोषणेनुसार अमेरिकेने आता त्याचा अखेरचा टप्पा सुरू केलाय, तर दुसऱ्या बाजूला सत्तास्थापनेसाठी तालिबानी नेत्यांच्या हालचालींनीही वेग घेतलाय.
सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच तेथील नागरिक तालिबान राजवटीच्या विरोधात आहेत. मात्र, त्या देशातील नेते लोक तालिबानशी मिळाले असल्याने तिथल्या नागरिकांना जगणं मुश्किल झालं आहे.