TOD Marathi

Mars ग्रहावरील भूस्खलनाचा फोटो ‘या’ एजन्सीने शेअर केला ; फोटो Social Media वर व्हायरल

टिओडी मराठी, 31 ऑगस्ट 2021 – आपल्या अनेक लोकांत नेहमीच मंगळ, सूर्यापासून चौथ्यास्थानी असलेला ग्रह कुतूहल निर्माण करत असतो. लोकांना या शेजारच्या ग्रहाबद्दल वेगवेगळ्या देशांनी केलेल्या वैज्ञानिक शोधांमुळे आणखी जाणून घेण्यास मदत झालीय. तसेच, विविध सोशल मीडियाद्वारे प्रत्येक वेळी जगभरातील अंतराळ संस्थांद्वारे लोकांना मंगळ ग्रहाचे मंत्रमुग्ध फोटो पाहण्याची संधी मिळते. ‘मार्टियन लँडस्लाइड’ चा अविश्वसनीय फोटो युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) द्वारे शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा फोटो १३ एप्रिल २०२१ रोजी एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने काढला असून त्या फोटोत मंगळ ग्रहाच्या एओलिस प्रदेशात (151.88 ° E/27.38 ° S) ३५ किमी रुंद खड्ड्याच्या काठावर ५ किमी लांबीचा भूस्खलन आढळून आले, असे एजन्सीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी भूस्खलनाबद्दल पुढील काही ओळींमध्ये अधिक स्पष्ट केलं आहे.

भूस्खलन ही विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितींत घडणारी भौगोलिक प्रक्रिया आहे. पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहावर ते विविध साईज आणि आकारात येतात आणि पृथ्वीवरील अॅनालॉग्सचा वापर ग्रहांच्या शरीरावर दिसणाऱ्या समान प्रक्रिया समजण्यासाठी केला जातो.

त्यांनी पोस्टच्या खाली पुढे लिहले आहे कि, ही पोस्ट दोन दिवसापूर्वी शेअर केली आहे. पोस्ट केल्यापासून, फोटोला २२,००० पेक्षा अधिक लाइक्स आहेत आणि ही संख्या वाढत आहे. या फोटोवर काही लोकांनी आवर्जून कमेंट्सही केल्यात.