TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जुलै 2021 – दहावीचा निकाल उद्या अर्थात दि.16 जुलै,2021 रोजी दु.1.00 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिलीय.

कालपासून सोशल मीडियावर दहावी निकाल कधी लागणार? अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर आज सकाळी शालेय शिक्षण मंत्रालयाने यावर स्पष्टिकरण दिली आहे. या दहावी निकालाबाबत पूर्व कल्पना याची माहिती अधिकृत कळवले जाईल, असे स्पष्ट केलं होतं. मात्र, आता स्वतः वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिलीय.

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होणार आहे, असे ट्विट देखील वर्ष गायकवाड यांनी केलं आहे.

हि आहे महत्त्वाची सूचना :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:०० वाजता जाहीर होणार आहे.

  • असा पहा तुमचा निकाल :
    निकालासाठी अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com
    मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करावे.
    आपणास एका नव्या पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
    आपली क्रेडेन्शियल्स टाइप करून लॉग इन करावे.
    आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल.
    या संदर्भासाठी निकालाचे प्रिंट आउट डाउनलोड करावे.

असे होणार मूल्यांकन :
यंदा राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावलेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा व दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाणार आहे.