टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 जून 2021 – भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधात जे नवीन नियम केले आहेत ते आम्हाला लागू होत नाहीत. कारण, आम्ही केवळ सर्च इंजिन म्हणून काम करतोय, अशी भूमिका गुगलने घेतलीय. त्यांनी ही भूमिका गुगलने दिल्ली हाय कोर्टात मांडली आहे.
एक न्यायाधिशाच्या खंडपीठाने गुगलवर ही हे नियम लागू होत आहेत, असा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला गुगलने आव्हान दिलंय. त्यावर कोर्टाने भारत सरकारचे मत मागविले आहे. सिंगल जज बेंचला सर्च इंजिन व सोशल मिडीया साईट यांच्यातील फरक न कळल्याने त्यांनी हा निकाल दिल्याचा दावा गुगलने केलाय.
केंद्र सरकारचे नवीन नियम हे सोशल मीडिया साईटसाठीचे आहेत. त्यामुळे त्याच्याशी आमचा काही संबंध पोहचत नाही असे गुगलचे म्हणणे आहे. सिंगल बेंच जजने 20 एप्रिल रोजी एका प्रकरणामध्ये गुगलच्या संबंधात हा निर्णय दिला होता.