TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 मे 2021 – सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट देखील येऊ शकते, असा अंदाज अनेकजण वर्तवत आहेत. मात्र, सरकारचे मुख्य वैज्ञानिक राघवन करोनाच्या तिसऱ्या लाटबाबत म्हणाले कि, आपल्याकडे कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही.

आपण करोनाची तिसरी लाट कशी रोखू शकतो?, याविषयी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी आपली मार्गदर्शन पर भूमिका मांडली. दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. के. विजय राघवन यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरलीय.

देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबत प्रशासकीय व्यवस्थापनाला हि यावेळी के. राघवन यांनी सूचनावजा इशारा दिलाय. आपण जर कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित येणार नाही. स्थानिक, राज्य तसेच जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर आपण करोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे सर्वकाही अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

त्यामुळे करोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचं आहे, असे सांगताना या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचं आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.