माजी महापौर प्रशांत जगताप यांची राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड

टिओडी मराठी, पुणे, दि. 7 मे 2021 – पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांची आज राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

गेल्या अडीच वर्षापासून पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी चेतन तुपे सांभाळत होते. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे आज पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.

विधानपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान प्रशांत जगताप यांनी पक्षाचे प्रभारी शहराध्यपद भूषवले आहे. दरम्यान, चेतन तुपे यांना हडपसरमधून उमेदवारी दिल्यानंतर पक्षाने प्रशांत जगताप यांना प्रभारी शहराध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली होती.

Please follow and like us: