टिओडी मराठी, दि. 2 सप्टेंबर 2021 – अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबान शुक्रवारी नव्या सरकारची घोषणा करणार आहे. तालिबान नवीन सरकारची घोषणा शुक्रवारच्या नमाजानंतर करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी काबूल शहर काबीज केले. त्यानंतरअमेरिकन सैन्यानेही सोमवारी रात्री अफगाणिस्तानातून पूर्णपणे बाहेर पडले.
अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला. आंतरराष्ट्रीय मदतीवर अफगाणिस्तानचे सरकार चालत आहे. अशा स्थितीत तालिबान देशाची सत्ता हातात घेणार असून अमेरिकेने अफगाणिस्तानचे सर्व निधी गोठवल्याने तालिबान समोर मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.
याबाबत टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानचा नेता हिबतुल्ला अखुंदजादा हा या सरकारचा सर्वेसर्वा असणार आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे त्याच्या आदेशानुसार काम करतील. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनमुल्ला समनगनी याने याबाबत माहिती दिलीय.
अनमुल्ला समनगनी याने सांगितलं की, नवे सरकार स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा प्रक्रिया पूर्ण झाल्यात. तसेच मंत्रिमंडळ संदर्भात आवश्यक निर्णयही घेतले आहेत. आम्ही ज्या इस्लामिक सरकारची घोषणा करणार आहोत, ती लोकांसाठी एक उदाहरण ठरेल.
‘तालिबान सरकार’चा उद्या होणार फैसला;’हा’ नेता बनणार पंतप्रधान