TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 सप्टेंबर 2021 – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात मोठा भूखंड नियमबाह्यरित्या बळकावला आहे, असा दावा या याचिकेतून केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष या याचिकेच्या सुनावणीकडे लागलं आहे.

बारामती शहरामध्ये सुमारे ३ हजार वर्ग मीटर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमबाह्यपणे बळकावली आहे, असा दावा या याचिकेतून केला आहे. अजित पवार यांनी हा भूखंड आपल्या मर्जीतल्या नगरसेवकाच्या ट्रस्टला ९९ वर्षांच्या करारावर दिल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

तो खंड हा गतिमंद मुलांच्या शाळेसाठी राखीव असताना त्या जागेवर चित्रपटगृह उभारण्याचा घाट घातला जात आहे, असे सांगितलं जातंय. या याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.