TOD Marathi

टिओडी मराठी, न्यूयॉर्क, दि. 8 मे 2021 – आता कोरोनावर चीनची लस आली आहे. याला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता जगात चीनची लस कोरोनासाठी उपलब्ध होणार असून सुमारे कोट्यवधी डोस जगभरात पोहोचविता येणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनची औषध निर्मिती कंपनी असलेल्या सिनोफार्मच्या लसचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिलीय. शुक्रवारी या व्हॅक्सिनला WHO ने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता ही लस गरजू देशांपर्यंत संयुक्त राष्ट्राच्या कोव्हॅक्स प्रोग्रॅम अंतर्गत पोहोचविण्यात येईल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपच्या निर्णयानंतर चीनी कंपनीच्या सिनोफार्म लसला संयुक्त राष्ट्राच्या कोव्हॅक्स अंतर्गत इतर देशांना पुरविण्यात येईल. येत्या काही आठवड्यामध्ये ही लस इतर देशांना उपलब्ध होईल. युनिसेफ व अमेरिकेतील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयातून ही लस वितरीत केली जाईल.

याअगोदर जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी एक प्रमुख समिती स्थापन केलीय. या समितीकडून चीनच्या कोरोना प्रतिबंधक लसला आपत्कालीन परिस्थितीत वापराला मंजुरी द्यायची की नाही? हे ठरविण्यात आले.

याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी दिलीय. यामुळे आता संयुक्त राष्ट्राकडून सुरु केलेल्या कोव्हॅक्स अंतर्गत लाखो डोस गरजू देशांपर्यंत पोहोचवता येतील. सिनोफार्म आता येत्या काही महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या कोव्हॅक्स अंतर्गत जगभरातील गरीब देशांना देण्यात येईल. .

अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या प्रादेशिक कार्यालये व मुलांसाठी संयुक्त राष्ट्राची एजन्सी युनिसेफच्या माध्यमातून याचे वितरण केलं जाणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ख्रिस्तियन लिंडमिअर यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय पुढच्या शुक्रवारपर्यंत होण्याची आशा आहे. लस किती प्रभावी आहे, याशिवाय सिनोफार्मने त्यांच्या दोन डोसबाबत खूप कमी माहिती दिलीय.