TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 8 मे 2021 – राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणांना अवकाळी पावसांने झोपडलं आहे. यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. पुढील चार दिवसात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला आहे.

भारतीय वेधशाळेने नुकत्याच दिलेली माहिती अशी, आज मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. पुढील तीन ते चार तासात राज्यामध्ये पुण्यासह अहमदनगर, सांगली, सातारा, हिंगोली, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

पुढील आणखी चार दिवस राज्यासह संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झालीय. आज विदर्भासहित दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.