TOD Marathi

टीम इंडियाचे माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Master Blaster Sachin Tendulkar) सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) सचिनच्या बॅटमधुन कालच्या मॅचमध्ये तुफान फलंदाजी झाली, त्यामुळे तेंडुलकरचे चाहते एकदम खूश आहेत.

तर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात तो दिसला होता. आयपीएलमध्ये (IPL) सुद्धा त्याला अद्याप खेळायची संधी मिळालेली नाही.


गोलंदाज अर्जुन तेंडुलकर सध्या युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडून ट्रेनिंग घेत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. २४ सप्टेंबरला अर्जुनचा वाढदिवस आहे.

22 सप्टेंबरपासून चंदीगड येथे आयोजित 27 व्या अखिल भारतीय जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट (All India JP Atre Memorial Cricket) स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर भाग घेत आहे. युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडिल अर्जुनला  क्रिकेटचे सगळे डावपेच शिकवताना दिसत आहेत.