TOD Marathi

टिओडी मराठी, रत्नागिरी, दि. 18 मे 2021 – यंदा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाने जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील असणाऱ्या गाव, तालुका, जिल्हा आदी ठिकाणीचे अनेक प्रकारे नुकसान झाले आहे. याच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील नाणीज या गावी भेट दिली आणि नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी उदय सामंत यांनी आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिलेत. आज दुपारपर्यंत नुकसानग्रस्त भागांना शिवसेनेतर्फे मदत पोहचविणार आहे, असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले आहे.

मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहारही केलाय.

आज सकाळी ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून रत्नागिरी तालुक्यातील तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी करण्यास सुरुवात केली. नाणीज गावातील पाहणी दरम्यान तहसीलदार शशिकांत जाधव, सरपंच गौरव संसारे यांसह संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

उदय सामंत यांनी खानू ग्रामपंचायतीला भेट देऊन नुकसानाबद्दल आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, तहसीलदार, सरपंच गणेश सुवारे आदी उपस्थित होते. यावेळी पाली पाथरट, माईन वाडी या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.

यावेळी पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, विभागप्रमुख तात्या सावंत, माझी सरपंच संदीप गराटे, प्रांत, तहसीलदार आदी उपस्थित होते. कापडगाव येथेही भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केलीय. यावेळी सरपंच विघ्नेश विश्वास कोत्रे आदी उपस्थित होते.