टिओडी मराठी, दि. 24 मे 2021 – करोनामुळे देशात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.मात्र, टाटा स्टील कंपनीने कर्मचारी व त्याच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी सामाजिक सुरक्षा स्कीमची घोषणा केली आहे. या योजनेची बरीच चर्चा सुरु झालीय. या योजनेअंतर्गत कंपनीतील कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला कंपनी 60 वर्षे पगार देणार आहे.
या संदर्भात व्यवस्थापनाने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यानुसार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, असे स्पष्ट केले आहे.
यात कर्मचाऱ्याला करोनामुळे मृत्यू झाला तर 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत पूर्ण पगार दिला जाणार आहे. तसेच या शिवाय कुटुंबाला सर्व वैद्यकीय सवलती आणि घर सुविधा दिली जाणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा भारतात पदवी पर्यंतचा शिक्षण खर्च कंपनी करणार आहे.
टाटा ग्रुपमधील कंपन्यां कर्मचारी हितासाठी नेहमी ओळखल्या जातात. त्यात पहिला नंबर टाटा स्टीलचा लागतो. कर्मचाऱ्यांना आठ तास काम, नफ्यावर आधारित बोनस, सोशल सिक्युरिटी, बाळंतपण रजा, कर्मचारी भविष्य निधी सुविधा चांगल्या प्रकारे लागू करणारी पहिली कंपनी टाटा स्टील आहे. त्यानंतर बाकी कंपन्यांनी तिचे अनुकरण करत आहे, असे सांगितले जाते.