TOD Marathi

मुंबई: पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपील पाटील यांनी दिली आहे.

भाजपा-मनसेमध्ये थेट युती जरी झाली नसली तरी आम्ही जागांसंदर्भात चर्चा केली असून जागा व्यवस्थापनाबद्दल दोन्ही पक्षांनी समहती दर्शवली आहे. विकास आणि चांगल्या कामांसाठी मनसे सोबत जाण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न कपील पाटील यांनी उपस्थित केला आहे.

त्याच सोबत ज्या ठिकाणी भाजपचा प्रभाव अधिक असेल तिथे मनसे आपला उमेदवार देणार नाही तर जिथे मनसेचा प्रभाव असेल तिथे भाजप आपला उमेदवार नाही देणार, अशा पद्धतीचा फॉर्म्युला सध्या भाजप आणि मनसेमध्ये करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.