टिओडी मराठी, काबूल, 29 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तान देशामधील तालिबानी राजवटीने महिलांवरील निर्बंध अधिक जाचक केलेत. संगीत आणि रेडिओ- चॅनेलवरील महिलांच्या सहभागावर तालिबानकडून बंदी घातली आहे. कंदहारमध्ये यासंदर्भातील फतवा जारी केला आहे.
तालिबानने अफगाणिस्तानची सूत्रे ताब्यात घेतली, त्यानंतर लगेच काही मीडिया हाऊसनी आपल्या वृत्तनिवेदक महिलांना कामावरून कमी केलं आहे. काबूलमधीलही काही प्रसिद्धीमाध्यमांनीही आपल्या काही पत्रकार महिलांना कमी केले आहे.
15 ऑगस्टला अफगाणिस्तान देशाच सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर लगेचच तालिबानने 17 ऑगस्टला महिलांना सरकारी नोकऱ्यांत सामावून घेण्याची तयार दर्शवली होती. आपली कट्टरवादी प्रतिमा पुसून टाकण्याचा हा प्रयत्न होता.
विशेषतः तालिबानी राजवटीला घाबरून देश सोडून जाणाऱ्या शेकडो नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी तालिबानने असे सांगितले होते. मात्र, आता तालिबानने आपला मूळ रंग दाखवायला सुरूवात केलीय. आता अनेक महिलांना आपले दैनंदिन आयुष्यगी धोक्यात आहे, अशी जाणीव व्हायला लागली आहे.