टिओडी मराठी, दि. 27 ऑगस्ट 2021 – बाळासाहेब बनसोडे यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कांचन बाळासाहेब बनसोडे आमरण उपोषण करत केली आहे. याला पुणे वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. यावेळी याबाबतचे निवेदन संबंधित कार्यालयाला दिले.
यावेळी वंचित वैशाली गायकवाड, रेखा चौरे, अनिता चव्हाण, अनिता जाधव, मीनाक्षी चंदनशिवे, सानिका फडतरे, आरती बडेकर,माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नजीर ऊर्फ चाचा खान, वसंत साळवी, देविदास तायडे, अंकुश कानडे, राजन नायर हे सर्व महिला कार्यकर्त्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हंटल आहे कि, बाळासाहेब बनसोडे गेली एकवीस वर्षे आबासाहेब काकडे कला आणि विज्ञान महाविद्यालय बोधेगाव (ता. शेवगाव,जिल्हा अहमदनगर) येथे राज्यशास्त्र विभागामध्ये पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. परंतु पूर्णवेळ काम करत होते. यावेळी प्राचार्य, संस्थाचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, सहसंचालक (उच्च शिक्षण पुणे विभाग पुणे) यांच्या संगनमताने त्यांच्यावर अन्याय करून पूर्णवेळ विद्यापीठ आणि शासनाची मान्यता असतानाही त्यांना पूर्ण वेळचे वेतन दिले नाही, त्यामुळे पूर्णवेळ वेतन मिळण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.
या संघर्षामध्ये आर्थिक छळवणूक, मानसिक त्रास यामुळे ताण असह्य झाल्याने त्यांचा 26 ऑगस्ट 2020 रोजी बाळासाहेब बनसोडे यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचे थकित वेतन आणि पेन्शन कुटुंबियांना मिळावी, याकरिता कुटुंबियांनी मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि इतरही अनेक ठिकाणी अनेक ईमेल आणि निवेदन आणि पत्र देखील पाठवले आहेत. तरी देखील त्यांना न्याय न मिळाला नाही.
त्यांना थकित वेतन मिळावे आणि कुटुंब पेन्शन मिळावी, याकरिता कांचन बाळासाहेब बनसोडे यांनी आमरण उपोषण करत आहेत. तिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील याद्वारे केली आहे.
यावेळी संचालकांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चा केली आहे, असे आश्वासन दिलं आहे. येत्या 15 दिवसांत अहवाल आल्यावर निर्णय देऊ, असेहि सांगण्यात आलं आहे.