TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 19 मे 2021 – वकिलांना तातडीने करोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने केली होती. या मागणीनुसार वकिलांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी ॲड. मंगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे केलीय.

ॲड. लेंडघर यांनी राज्यातील वकिलांसाठी सुमारे 100 कोटी रुपये द्यावेत अशी, मागणी यापूर्वी मुखमंत्र्याकडे केली आहे. कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. अनिल गोवरदिपे यांनी 10 मे रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे वकिलांना तातडीने लस देण्याविषयी पत्र दिले. या पार्श्वभूमीवर ॲड. मंगेश लेंडघर यांनी ही मागणी केलीय.

वकील हा समाजाचा अविभाज्य घटक असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम वकील करत असतात. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वकिलांनी मोठे योगदान दिले आहे. याचा विचार करून वकिलांना प्राधान्याने लस मिळवून द्यावी, अशी मागणी ॲड. लेंडघर यांनी मुखमंत्र्याकडे केलीय.