TOD Marathi

पुणे: राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद आज पुण्यात पार पडली. यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काही घोषणा केल्या आहेत.

● साधारणतः जुलै महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार

● “स्वराज्य” संघटना स्थापन करणार

● याच महिन्यात महाराष्ट्र दौरा करणार

● कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही

अशा महत्त्वाच्या घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केल्या.

या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या सहा वर्षांच्या राज्यसभेच्या कार्यकाळात गडकोट किल्ल्यांसाठी केलेले काम, राजधानी दिल्लीत सुरु केलेली शिवजयंती यांसह महत्त्वपूर्ण कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली. मी जे काम केलं, माझ्या कामाची जी कार्यपद्धती होती, ती बघून येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहनही केलेलं आहे.

“स्वराज्य” संघटना बांधण्यासाठी मी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असून ‘शिवप्रेमी’ ‘शाहूप्रेमी’ यांना संघटित करणार, भविष्यात गरज वाटल्यास ही संघटना राजकीय पटलावर येईल असेही त्यांनी सांगितले.