TOD Marathi

राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

संबंधित बातम्या

No Post Found

नवी दिल्ली : राजीव कुमार यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ मेपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. विधी आणि न्याय मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. त्यांनी वित्तीय क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. तर तब्बल ३ लाखांपेक्षा जास्त बोगस कंपन्यांचे बँक खाते त्यांनी गोठवले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. विद्यमान सुशील चंद्रा यांचा कार कुमार मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार हाती घेतील. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राजीव कुमार हे १ सप्टेंबर २०२० पासून भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी भारत सरकारमध्ये ३६ वर्ष सेवा केली आहे. राजीव कुमार यांनी सामाजिक, वन आणि पर्यावरण, मानव संसाधान, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातही उल्लेखनीय काम केलेले आहे.