ललित कुमार मोदी आणि सुश्मिता सेन यांच्या काल व्हायरल झालेल्या फोटो नंतर अनेक चर्चांना उधाण आलंय. ललितकुमार मोदी यांनी काल एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये बॉलीवूड मधील आघाडीची अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत काही खास फोटो शेअर केले. आणि जे कॅप्शन लिहिलं होतं त्यावरून लोकांना प्रश्न पडला की यांनी लग्न केलंय का?
Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families – not to mention my #better looking partner @sushmitasen47 – a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓. In love does not mean marriage YET. BUT ONE THAT For sure pic.twitter.com/WL8Hab3P6V
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022
तर यावर स्पष्टीकरण देण्यासाठी ललित कुमार मोदी यांनी आणखीन एक ट्विट करत स्पष्टीकरणासाठी अजून लग्न झालेला नाही मात्र एकमेकांना डेट करतोय. ते सुद्धा लवकरच होईल असं आणखी एक ट्विट केलं.
Just for clarity. Not married – just dating each other. That too it will happen one day. 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 pic.twitter.com/Rx6ze6lrhE
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022
आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात या गोष्टीची चर्चा सुरू झाली. या सर्व गोष्टींवर स्पष्टीकरण देण्यासाठी सुष्मिता सेनने एक पोस्ट केली आहे. सुष्मितानं तिच्या दोन मुलींसोबतचा फोटो शेअर केला आहे. ललित मोदीसोबतच्या नात्यावर यावर सुष्मिता काय बोलतेय, याकडं सर्वांचच लक्ष लागलं होतं. अखेर तिनं पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
“मी लग्न केलेलं नाही, ना कुठल्याही अंगठीचा स्वीकार, या क्षणी मी फक्त एवढंच सांगेन माझ्या सभोवताली प्रेमच प्रेम आहे. मला वाटतं इतकं स्पष्टीकरण पुरेसं आहे.”
सुष्मिता सेन
मालदीवमध्ये ट्रीप झाल्यानंतर लंडनला कुटुंबांसह परतलो आहे, माझी बेटर हाफ सुष्मिता सेनचा उल्लेख कसा टाळायचा. एक नवीन सुरुवात, एक नवीन आयुष्य, अमाप आनंद होतोय, असं ट्वीट करताना ललितकुमार मोदीनं नात्याबद्दल खुलासा केला होता.