TOD Marathi

भारतात आयपीएलचा दबदबा तयार करणारे ललित मोदी हल्ली तुफान चर्चेत आले आहे. आपण सुष्मिताला डेट करत आहोत आणि आता लवकरच गोड बातमी देणार असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर (Lalit Modi Social Media Post) वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आलं होतं. खुद्द अभिनेत्री सुष्मिता सेननं या सगळ्या अफवा असल्याचे सांगत आपण कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता आणि ललित मोदी हे नेटकऱ्यांच्या (Bollywood Actress Sushmit Sen) रडारवर आले आहेत. त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना या दोन्ही सेलिब्रेटींनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर देखील दिले आहे. आता पुन्हा ललित मोदींनी पोस्ट करत नेटकऱ्यांवर चांगलीच आगपाखड केली आहे.

ललित मोदींनी तर सुरुवातीला सुष्मिता सेनसोबत लग्न करणार असल्याचं व्टिट केले होते. त्यानंतर ती पोस्ट बदलून आपण एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं होतं. (Sushmita Social Media Post News) गोल्ड डिगर असं म्हणून सुष्मितावर टीका करण्यात येत होती. यासगळ्यात सुष्मिताचा भाऊ राजीव तिच्या पाठीशी उभा होता. त्यानं आपल्या बहिणीची बाजू घेत सोशल मीडियावर जे काही सुरु आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुष्मितानं देखील यासगळ्या अफवा असल्याचे सांगून ललित मोदी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सुष्मितानं कुणीही मला काही शिकवण्याची गरज नसून मी काय केलं आहे, काय करते आहे याची मला चांगली समज असल्याचे सांगितले होते.

आता मोदी यांची पुन्हा एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. अनेकांनी ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या वयावरुन त्यांना ट्रोल केले आहे. तर कुणी मोदी यांचे भारतातून पळून जाणे, त्यांच्यावर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप याचा संबंध सुष्मिता सेनशी जोडला गेला आहे. त्यावरुन मोदी यांनी ट्रोलर्सला फटकारले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, मला एकच गोष्ट सांगा कोणत्या न्यायलयानं मला दोषी ठरवले आहे. माझ्यावर सतत भ्रष्टाचाराचे जे आरोप होत आहेत पण मला कुणीही दोषी म्हटलेलं नाही. सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की, भारतातील 15 पैकी 12 शहरांमध्ये बिझनेस करणं किती अवघड गोष्ट आहे.
लोकांनी मला पळपुटा म्हटलं आहे. मला आता तुम्हाला काहीही सांगायचं नाही. कारण कुणी मी काय बोलतोय हे ऐकून घ्यायला तयार नाही. माझं म्हणणं न ऐकताच मला ट्रोल केले जात आहे. लोकांनी आरोप थांबवावेत. आम्हाला शांतपणे जगु द्यावं. यापूर्वी देखील मोदी यांनी मोठी पोस्ट करुन आपली व्यथा नेटकऱ्यांसमोर मांडली होती. दुसरीकडे सुष्मितानं देखील आता आपल्याला नेटकऱ्यांच्या म्हणण्याचं काही वाटत नसल्याचे सांगितले होते.