TOD Marathi

कोल्हापुर:
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह त्यांची दोन मुलं निलेश राणे आणि नितेश राणे (Nilesh Rane and Nitesh Rane) हे अनेकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Party chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत असतात. राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार स्थापन झाल्यानंतर राणे पिता-पुत्रांनी अनेकदा उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. या घडामोडींनंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे (Sushma Andhare has criticized Narayan Rane along with her two sons).

कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्या दोन मुलांचा उल्लेख ‘बारकी बारकी पोरं’ असा केला आहे. त्यांनी केलेल्या या खोचक टिपणीमुळे व्यासपीठावर एकच हशा पिकला होता. याचवेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची महिलांबद्दल असलेल्या मानसिकतेवरूनही टीका केली. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काहीच कारवाई करत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.

राणे पिता-पुत्रांवर टीकास्र सोडताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “नारायण राणेंची जी दोन बारकी-बारकी पोरं आहेत, त्यांनी अनेकदा मातोश्रीवर टीका केली. मी बारक्या लेकरांबद्दल फार काही बोलत नसते. अजिबात बोलत नसते. पण ती जी दोन बारकी-बारकी लेकरं आहेत ना… त्यांनी उंची नसताना मातोश्रीवर गरळ ओकली आहे. मी त्यांच्या बौद्धिक उंचीबद्दल बोलतेय. पण देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही” अशी टीका अंधारे यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णायक पदावर नाहीत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटचा बाहुला आहेत. त्यांनी रिमोट चालू केला की ते बोलतात, बंद केला की ते थांबतात. देवेंद्र फडणवीस हेच कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत, अशा शब्दात उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. भाजपने द्वेषमुलक राजकारण सुरु केलं आहे. एकनाथ शिंदे बाहुला असल्यामुळे फडणवीसांचीच लाईन पुढे खेचत आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.