TOD Marathi

‘६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२’चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘गोष्ट एका पैठणीची’चे (Goshta Eka Paithanichi) नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीच्या सामान्य स्वप्नाचा प्रवास असणाऱ्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर (Saili Sanjeev, Suvrat Joshi, Mrinal Kulkarni, Milind Gunaji, Shashank Ketkar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमिअर सिंगापूर (Singapore) येथे झाला. आता लवकरच म्हणजे २ डिसेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरमध्ये सायली संजीव, सुव्रत जोशी आणि आरव शेट्ये (Saili Sanjeev, Suvrat Joshi and Aarav Shetye) दिसत असून त्यांचं हसतंखेळतं कुटुंब दिसत आहे. छोट्या गावातील या गृहिणीचा स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास तिला कुठंवर घेऊन जातो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) म्हणतात, ” बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच ‘गोष्ट एका पैठणीची’ने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच आम्ही काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रीमिअर सिंगापूरमध्ये केला आणि मुख्य म्हणजे आम्हाला तिथे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हा अनपेक्षित प्रतिसाद आम्हाला भारावणारा होता. असाच प्रतिसाद आता आपल्या महाराष्ट्रातही मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.”

चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे (Shantanu Rode) म्हणतात, ” प्रत्येक जण उराशी एक स्वप्न बाळगून असतो आणि त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वोतोपरी धडपड सुरु असते. यात कधी यश येते, कधी अपयश येते. आयुष्यात एखादी पैठणी घ्यावी, इतकं सामान्य स्वप्न पाहणाऱ्या गृहिणीचा असामान्य प्रवास यात पाहायला मिळणार आहे. हा कौटुंबिक सिनेमा नकळत बऱ्याच गोष्टी शिकवणारा आहे.”

या सिनेमाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे ( Shantanu Rode)यांचे असून चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता (Akshay Vilas Bardapurkar, Abhyanand Singh, Piyush Singh, Saurabh Gupta) यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती विळेकर, गायत्री दिलीप (Ashwini Chaudhary, Chintamani Dagde, Soumya Mohanty Vilekar, Gayatri Dilip) चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत.