TOD Marathi

पुणे:
विरोधकांकडून सातत्याने शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार, विविध निर्णय, सोबतच आता देवेंद्र फडणवीसांच्या कृतीचीही चर्चा होऊ लागली आहे. (Action of Devendra Fadnavis) यामध्ये आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. (Supriya Sule talks on CM Eknath shinde)

पुणे महानगरपालिका (PMC) समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेसचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. (Supriya Sule in Pune)

“नवीन सरकार गोंधळलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान होतोय आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे बिचारे मुख्यमंत्री, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यातल्या राजकारणाबद्दलही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतःच गोंधळात आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे. ते महाराष्ट्राला न शोभणारं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मला खूप काळजी वाटते. त्यांना प्रॉम्प्टींग करणं, चिठ्ठी देणं अशा कृतीतून मुख्यमंत्र्यांना कमीपणा दाखवायचं काम उपमुख्यमंत्री करत आहेत, अशी टिकाही खासदार सोबत असून सुप्रिया सुळे यांनी केली.