TOD Marathi

कंगनापूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी गाजवली इंदिरा गांधींची भूमिका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी चर्चेत आहे. (Kangana Ranaut Emergency movie) नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटातील कंगना राणौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात कंगनानं दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. प्रोमोमध्ये, कंगना इंदिरा गांधींच्या पोशाखात चष्मा आणि सुती साडी परिधान केलेली दिसत आहे. पण कंगनापूर्वी अनेक अभिनेत्रींनी इंदिरा गांधीची भूमिका साकारली आहे. याविषयी तुम्हाला माहित आहे का?

लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी विवेक ओबेरॉय यांच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. किशोरी शहाणे यांच्या भूमिकेविषयी देखील खूप चर्चा झाली होती. (Actress Kishori Shahane played role of Indira Gandhi in a movie)

सुप्रिया विनोद यांनी 2017 मध्ये इंदिरा गांधीची भूमिका साकारलेली पहायला मिळाली. मधुर भांडारकरच्या इंदू सरकार या चित्रपटात त्यांनी ही भूमिका साकारली होती. ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ या मराठी चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी इंदिरा गांधीची भूमिका साकरली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक इंदिरा गांधींसारखाच बनवलेला पहायला मिळाला. (Actress Supriya Vinod played role of Indira Gandhi in a movie Indu Sarkar)

‘बेलबॉटम’ या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ताने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला होता त्यामधे ही लाराला ओळखण कठिण झालं होतं. (Actress Lara Dattae played role of Indira Gandhi in a movie)


ठाकरे चित्रपट ही जोरदार चर्चेत आला होता. या चित्रपटात अभिनेत्री अवंतिका आकरकरने इंदिरा गांधीची भूमिका साकारली होती. त्या रोलचीही खुप चर्चा झाली होती. (Actress Avantika Akarkar played role of Indira Gandhi in a movie Thackeray)