नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने वाराणसी कोर्टाला आज कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी आज सुनावणी होणार नसून शुक्रवारी दुपारी 3 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे.
मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ते हुजेफा अहमदी यांनी देशभरात य प्रकरणी खटले दाखल केल्यानं आज सुनावणी घेण्याची विनंती केली होती. न्या. चंद्रचूड यांनी विनंतीवरुन खंडपीठातील इतर न्यायाधीशांसह चर्चा करून शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचं सांगीतलं आहे.
दरम्यान 13 मे रोजी अंजुमन इंतजामिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु 17 मे रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. तोपर्यंत मशीद संकुलाच्या सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं होतं.