मुंबई: १० सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने हा सामना रद्द करावा लागला. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना रद्द केला असल्याची माहिती मिळाली.
सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. त्याचवेळी भारतीय खेळाडूंची शेवटची टेस्ट खेळण्याची इच्छा नव्हती, असा दावा इंग्लिश मीडियानं केला आहे. या सर्व आरोपांना फेटाळून लावत टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनी विरोधकांना चोख उत्तर दिल आहे.
आपल्या खेळाडूंनी या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. टीम इंडियाला सीरिज 3-1 ने जिंकण्याची संधी होती. त्यामुळे भारतीय खेळाडू शेवटची टेस्ट खेळण्यास तयार नव्हते हे मला मान्य नाही. आमचे खेळाडू खेळण्यास तयार नव्हते. हे बीसीसीआयनं जाहीर करायला हवं. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय मी हे मान्य करणार नाही, असं गावसकर यांनी स्पष्ट केलं.