TOD Marathi

मुंबई: संजय राऊत यांनी महावीकस आघाडीचा प्रयोग इतर राज्यांमध्ये देखील करणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला होती, मात्र आता केवळ ८० ते १०० जागांवर लढणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

राऊतांच्या या भूमिकेवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. ‘२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे. औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशात काही स्थानिक संघटना पाठीशी असल्याने तिथे आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याच सोबत गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, अशी देखील भूमिका संजय राऊतांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना मांडली.