TOD Marathi

मुंबई: सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर आहे. पुढील चार दिवसात मुंबई आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या वातावरणात होणाऱ्या बदलामूळे पुढेचे चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान विभागाकडून कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर कायम राहील. जिल्ह्याचा विचार करता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

१३ आणि १४ सप्टेंबरला गोवा, कोकण याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. वातावरणात होत असलेल्या या बदलांमुळे निसर्गाची अशी अनिश्चितता होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.