टिओडी मराठी, दि. 6 जुलै 2021 – बाहेरील अन्न पदार्थ खाल्याने तसेच बाहेरील पाणी पिल्यामुळे काहीवेळा घशाचे दुखणे सुरु होते. घसा दुखण्यामागे बाहेरील इन्फेकशन देखील असू शकतं, हेही ओळखलं पाहिजे. तसेच अधिक घसा दुखी होत असेल तर अवश्य डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीला घास दुखी सुरु असताना गरम पाण्याच्या गुळण्या केली जाते. तसेच हळद टाकून दूध किंवा कोमट पाणी घेऊन गुळण्या केल्या जातात. हे घरगुती उपचार केले जातात. मात्र, सध्या कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे घसा दुखीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच यावर उपचार करायला हवा.
सकाळच्या वेळी मुख्यत: सकाळी सहा वाजता हवेत धूळ आणि दव पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळच्या वेळेचे चालताना काळजी घ्यावी.
अंग खूप गरम झाले असेल किंवा व्यक्तीला श्वास घेण्यात त्रास होत असेल आणि खूप ताप आला असेल तर ऍन्टिबायोटिक्स औषधे घेऊ नयेत. अशा स्थितीत योग्य उपचारासाठी डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेण्याची काळजी घ्यावीत. आजार बरा झाला आहे, असे समजून औषधाचा कोर्स पूर्ण करणे टाळू नका. औषधाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जंक फूड टाळावे. तसेच तळलेले पदार्थ आणि शीतपेये यांचे सेवन करणे टाळावे. दिवसभरात तुलसी किंवा आल्याचा चहा, मिठाचे पाणी आणि दिवसातून वारंवार गरम पाणी पिणे हेदेखील उपयुक्त ठरू शकते.
आजाराच्या काळात सामान्यत: रोगप्रतिकारशक्ती कमी असते. पौष्टिक आहाराचे सेवन करावे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पाण्यात थोडासा मध टाकून पाणी प्यावे.
यामुळे फुफ्फुसांत असलेल्या म्युकासविरुद्ध लढण्यास मदत होणार आहे. ठराविक कालावधीत आरोग्यदायी आहार घ्यावा. आणि बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
(टीप : हि माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आवश्य डॉक्टर, तज्ञांचा सल्ला घ्यावा.)