TOD Marathi

सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी करमाळा तालुक्यातील केमजवळ रुळावरून घसरली. (Train slipped from track) सोलापूरहून पुण्याच्या दिशेने ही गाडी येत होती. (Solapur Pune route) रात्री 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरली आणि गाडी शेतात जाऊन थांबली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, पहाटेच्या सुमारास मुंबईहून कर्नाटकच्या (Mumbai Karnataka railway) दिशेने जाणाऱ्या गाड्या सोलापूरला काही वेळ उशिरा पोहोचल्या.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपातकालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घसरलेली मालगाडी ही लूप रुळावर होती, त्यामुळे अधिक वेळ वाहतूक बंद नव्हती. सकाळी सात वाजताच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाले मात्र गाडी रुळावरून घसरण्याचे कारण चौकशीनंतर समोर येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे

सोलापूरहून पुण्याच्या दिशेने ही गाडी येत होती. (Solapur Pune route) रात्री 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरली आणि गाडी शेतात जाऊन थांबली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, पहाटेच्या सुमारास मुंबईहून कर्नाटकच्या (Mumbai Karnataka railway) दिशेने जाणाऱ्या गाड्या सोलापूरला काही वेळ उशिरा पोहोचल्या.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपातकालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घसरलेली मालगाडी ही लूप रुळावर होती, त्यामुळे अधिक वेळ वाहतूक बंद नव्हती. सकाळी सात वाजताच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाले मात्र गाडी रुळावरून घसरण्याचे कारण चौकशीनंतर समोर येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.