TOD Marathi

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (MLA Sanjay Shirsat got heart attack) सोमवारी दुपारी एक बैठक आटोपून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर ते औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटल मध्ये गेले. संजय शिरसाट यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना दुपारी उपचारासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (He was being treated in Ciigma United Hospital of Aurangabad, later on he shifted to Lilavati Hospital Mumbaiu) त्यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी मुंबईत झालेली आहे. त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. कालपासून रक्तदाब वाढला होता. त्यामुळे सिग्मा रुग्णालयात ते अंडर ऑब्झर्वेशन होते. मात्र ही हार्ट अटॅकची लक्षणे होती म्हणून आज अधिक उपसारासाठी मुंबईला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबईच्या लीलावती रुग्णालया डॉ. पारकर आणि डॉ. गोखले यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार होणार आहेत. दरम्यान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर संजय शिरसाठ हे विमानतळावर चालत गेले. त्यामुळे इतर हार्ट अटॅकच्या चर्चा निरर्थक आहेत असेही त्यांच्या निकटच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे. संजय शिरसाट यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले. मुंबई विमानतळावरून उतरल्यानंतर ते स्वतः चालत एका खाजगी कार्ड ॲम्बुलन्समध्ये बसले. मात्र, यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि अशक्तपणा स्पष्ट जाणवत होता.