TOD Marathi

फेसबुक लाईव्हमुळे उलगडले अपघाताचे रहस्य ! भीषण अपघात

उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमध्ये बीएमडब्लू कारचा अपघात होऊन चौघांचा मृत्यू झालाय. बीएमडब्लू कारचा वेग अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातावेळी बीएमडब्लू कारचा वेग ताशी 230 किमी इतका होता. अपघातात मरण पावलेले चारही प्रवासी पेशाने डॉक्टर होते. यामध्ये डॉ. आनंद कुमार, इंजीनिअर दीपक आनंद, अखिलेश सिंह आणि भोला कुशवाहा अशी अपघातात मयत झालेल्या तरुणांची नाव आहेत. चौघे जण बीएमडब्लू कारने लखनौ इथे चालले होते. दरम्यन सदर कार हि मयत भोला कुशवाहा चालवत होता.

अपघातापूर्वी चौघांनी फेसबुक लाईव्ह केले. कार चालवत असताना चौघे फेसबुकवर लाईव्ह करत होते. लाईव्हमध्ये चौघेही कारच्या स्पीडवर चर्चा करत होते.
तसेच आपल्या मित्रांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भरधाव बीएमडब्लूचा रोमांचक प्रवास दाखवत होते. कोणी कारचा वेग वाढवण्यास सांगत होतं. तर कोणी सीटबेल्ट लावण्यास सांगत होतं. आणि याच दरम्यान भरधाव कार कंटनेवर धडकली आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला.

घडलेला अपघात इतका भीषण होता की, कारचा संपूर्ण चुराडा झाला. तसंच एका तरुणाचे सर्व अवयव शरीरापासून वेगळे झाले, असे प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितले. मयत डॉक्टर आनंद कुमार आणि इंजिनिअर दीपक आनंद एकमेकांचे मेव्हणे होते. तर अन्य दोघे डॉक्टरचे मित्र होते. डॉक्टर आनंद कुमार हे NMCH मध्ये लेप्रोसी विभागात HOD होते. त्यांना महागड्या कार आणि बाईकचा शोक असल्याने त्यांच्याकडे 16 लाखाची बाईक आणि सव्वा कोटीची बीएमडब्लू होती. बीएमडब्लूच्या सर्विसिंगसाठी ते त्यांचे मेहुणे आणि दोन मित्रांसह लखनौला जात होते.