मला वाटतं हे सर्व हास्यास्पद आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम आहे. त्यांच्या गैरहजेरीत कोणाला कारभार सांभाळायची गरज नाही. ज्या माझ्या फोटोबद्दल बोललं जात आहे तो फोटो आमच्या ठाण्यातील निवासस्थानचा आहे. आम्ही दोघं इथे असतो. मी कुठे मंत्रालय, वर्षा बंगल्यावर बसलोय असं नाही, हे आमचं ठाण्यातील घर आहे. अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde over his viral photo on CM Chair) यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वर्पे (Ravikant Varpe NCP) यांच्यासह राजकीय क्षेत्रातील विविध नेते मंडळींनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले आहेत अशा फोटो शेअर केला होता. त्यावर बोलताना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, आम्ही दोघं आम्ही याठिकाणी बसतो, लोकांचे गाऱ्हाणे एकतो. इथे मुख्यमंत्रीही बसतात. (CM Ekanath Shinde) मूव्हेबल बोर्ड आहे. हि घरची व्यवस्था आहे. मुख्यमंत्री खुप सक्षम आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. लोकांना माहीत आहे कोण काय करतं. आपण कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देत नाही. जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर खुश आहे. असंही मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.