TOD Marathi

‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) मधील भूमिका आणि अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) या चित्रपटातील गाण्याने हिंदी सिनेसृष्टीत आपली विशेष ओळख मिळून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री समांथा एकदा पुन्हा चर्चेत आली आहे.दक्षिणेतील चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवूडमध्येही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे समांथा (Samantha). तिने दक्षिणेतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप सोडली आहेच. आणि आता ‘ मागच्या वर्षी समांथाने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केल्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, तेव्हापासून चाहते त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी जोर धरत आहेत. दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, समांथा आता पुन्हा एकदा लग्नासाठी तयार आहे अशी बातमी समोर आली आहे.
विशेष म्हणजे गुरुंनी दिलेल्या प्रत्येक सल्ल्याचे समांथा पालन करते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तिने त्यांचा हा सल्लाही मान्य केला आहे असं म्हटलं जात आहे. सध्या तिचे गुरु तिला तिचा भूतकाळ विसरण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. आणि त्यासाठी वेगवेगळे उपाय सांगत आहेत त्यातलाच एक उपाय म्हणजे परत लग्न करणे आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करणे. त्यामुळे आता समांथाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्ताला समंथाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समंथा रुथ प्रभू पुढे यशोदा, ‘शाकुंतलम’ आणि ‘कुशी’ (Yashoda, ‘Shakuntalam’ and ‘Kushi’) मध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती दिनेश विजानच्या बॉलीवूड आणि इंग्रजी चित्रपट ‘द अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ (The Arrangement Of Love) मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.