TOD Marathi

अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade ) हा चेहरा आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. विनोदाच्या जगतात स्त्रीदेखील पुरुषाच्याबरोबरीने आपला ठसा उमटवू शकते हे श्रेयाने दाखवून दिलं.

त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ (chala hawa yeu dhya) या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असल्याचं पाहायला मिळतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली श्रेया सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. त्यामुळे बऱ्याचदा ती नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

श्रेयाला अभिनयासह पर्यटनाचीही खास आवड आहे. त्यामुळे ती बिझी शेड्युलमधून वेळ काढून वेगवेगळ्या ठिकाणांना नेहमीच भेट देत असते. यात अलिकडेच तिने एका नविन ठिकाणाला भेट दिली. तिथले काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात एका फोटोला तिन दिलेलं कॅप्शन हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस म्हणून श्रेयाने नवीन ठिकाणाला भेट दिली. तिथला एक फोटो तिने शेअर केला. या फोटोमध्ये ती चहा पित असून तिने भन्नाट कॅप्शन देखिल दिलं आहे. “एक गरम चाय कि प्याली हो ….पर वो Room service वाली हो #sundaythoughts”, असं कॅप्शन श्रेयाने तिच्या या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, श्रेया सोशल मीडियावर कायमच सक्रीय असून ती सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. कधी सेटवरील तर कधी वैयक्तिक जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती तिचे पर्सनल अपडेट्स चाहत्यांना नेहमीच देत असते.