TOD Marathi

रस्तेमार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा; आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी रुग्णवाहिकेतून येणार…

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज  मतदान पार पडतंय. सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता असल्यानं सर्वच पक्षांसाठी एकेक मत महत्वाचं आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करताना पहायला मिळतायत. ( Rajyasabha Election In Maharashtra )

अशातच पिंपरी चिंचवडमधील ( Piumpari Chinchwad) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Lakshaman Jagtap) राज्यसभेच्या मतदानासाठी मुंबईत  (Mumbai)येणार असल्याचं निश्चित झालंय. ते सकाळीच साडेआठच्या सुमारास मुंबईला रवाना झाले असून अॅम्ब्युलन्समधून मुंबई गाठणार आहेत. दरम्यान आजारी असल्याने लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत आणण्यासाठी रस्तेमार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती आहे. (MLA Lakshman Jagtap Come For Rajyasabha Vote )

दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी जिकिरीचं ठरेल. त्यामुळे कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने अखेर ते मतदानाला जाणार हे निश्चित झालं आहे.