TOD Marathi

मुंबई :  केतकीनं जे काही केलं, ते अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनकच आहे. आपल्या सर्वांना मत मांडण्यांचा अधिकार आहे. परंतु आपण आपली मर्यादा सांभाळायला हवी, असं मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे. केतकी चितळेच्या प्रकरणावर त्यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या आ्हेत.

पोंक्षे म्हणाले की, सबुकवर केतकीची पोस्ट मी वाचली. मला वाटतं की तिनं कुणाची तरी पोस्ट रिशेअर केली आहे. परंतु तरीही तिनं जे काही केलं, ते अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनकच आहे.

तसेच आपण सोशल मीडियावर काय शेअर करतो ते माहिती असलं पाहिजे. याप्रकरणाबद्दल बोलायचं तर ती अजूनही लहान मुलगी आहे. त्यामुळे तिला सुधारण्याची एक संधी मिळायला हवी,अशी विनंतीही त्यांनी यावेळेस केली आहे.