TOD Marathi

राज्यात सध्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) निमित्ताने कोणाचा दसरा मेळावा भव्यदिव्य होणार याच्यात जणू स्पर्धा सुरू आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे (Eknath Shinde)अशा दोन मोठ्या मेळाव्यांची तयारी मुंबईत सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.

दरम्यान मेळाव्याच्या पूर्वीच शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे. आज दसरा मेळाव्याच्यावेळी शिंदे गटात पाच आमदार आणि दोन खासदार प्रवेश करू शकतात, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आधीच शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांची मोठी संख्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना आता आणखी कोण दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात जातील, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच मुंबईतील एक खासदार येऊ शकतात, असं म्हटल्यानंतर ते खासदार कोण किंवा दोन खासदार आणि पाच आमदार नक्की कोण? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मात्र बाकी लोकांसाठी जरी ही उत्सुकता असली तरी दसरा मेळाव्यापूर्वीच उद्धव ठाकरेंसाठी हा धक्का आहे? का असा देखील चर्चा सुरू आहेत.