TOD Marathi

राज्यात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे. कधी नव्हे ते पहिल्यांदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. कारण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे. (Shivsena Dasara Melava in Shivaji Park Ground Mumbai)

मात्र, या सगळ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाकडे स्पष्ट करावी लागणार आहे. (Uddhav Thackeray to present his side in front of EC) शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी या संदर्भातली महत्त्वाची कागदपत्र घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत आणि आयोगापुढं बाजू मांडण्यात येणार आहे.

कोणते मुद्दे मांडायचे? आपली नेमकी भूमिका काय असावी? यासाठी हे पदाधिकारी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची देखील माहिती आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मदत दिली आहे. तेव्हा चिन्हाबाबत शिवसेनेतील ठाकरे गट कोणती कागदपत्र सोपवणार आणि यासंदर्भातला निकाल काय लागणार याची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता आहे.