जसजशी संध्याकाळ होत आहे तसतशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या दसरा मेळाव्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. दोन्ही मैदानावर दोन दसरा मेळाव्यासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी शिंदे गटानं डाव साधला आहे. शिवसेनेचे थीम सॉंग जे अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आहे, त्यांचं संगीत दिग्दर्शन आहे, तेच गीत त्यांच्या आवाजात प्रत्यक्ष अवधूत गुप्ते यांनी बीकेसी मैदानावर सादर केला आहे.
ज्या फॉन्टमध्ये शिवसेना हे नाव लिहिलेलं असतं, ज्या पद्धतीने शिवसेनेचा मंच असतो शिवसेनेच्या मंचाची सजावट असते काहीशी त्याच पद्धतीने मात्र त्याला आधुनिकतेची जोड देत बीकेसी मैदानावर ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याआधीच एकनाथ शिंदे बरच काही सुचवू पाहत आहेत. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे, त्याचबरोबर।स्मिता ठाकरे यादेखील बीकेसी मैदानावर पोहोचलेले आहेत. अवधूत गुप्ते यांनी प्रत्यक्ष बीकेसी मैदानात शिवसेनेच्या थीम सॉंग गाणं आणि ठाकरे परिवारातील अन्य दोन सदस्य बीकेसीत पोचणं या दोन अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आहेत.
या घडामोडींच्याद्वारे भाषण सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिला आहे.