TOD Marathi

राज्याच्या राजकारणात आजचा दिवस हा दोन दसरा मेळाव्यासाठी परिचित राहणार आहे. (todays Day will remain memorable for Dasara Melava)  दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो आणि अर्थात तो एकच होत होता. मात्र, यावर्षी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे (After split in Shivsena) दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava in Shivaji Park Ground Mumbai) यांच्या नेतृत्वात तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे (Eknath Shinde tweeted before Melava) आणि या ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर थेट हल्ला केलेला आहे.

‘मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे’ अशा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहेत. या माध्यमातून शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला केला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे त्यांच्या टीकेला काय उत्तर देतील, हे बघावं लागेल. दोन्ही मैदानावर कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.

आठ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाषणासाठी उभे राहतील त्याचवेळी बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे देखील (CM Eknath Shinde) भाषणासाठी उभे राहतील. मात्र, या दोघांची भाषणे एकाच वेळी सुरू होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या दसरा मेळाव्यात काय घडेल याची उत्सुकता अर्थातच सर्वांना आहे.

शिंदे गटाकडून आपल्या पहिल्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 51 फुटी तलवार या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, बीकेसी मैदानावर शस्त्रपूजन होणार आहे. सोबतच उदय सामंत यांच्या वतीने बारा फुटांची चांदीची तलवार देखील एकनाथ शिंदे यांना भेट देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन तलवारींचीही राजकीय वर्तुळात चांगली चर्चा आहे.