TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 25 ऑगस्ट 2021 – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्ष कधीकाळी मित्र पक्षी म्हणून राजकीय वर्तुळात होते. मात्र काही दिवसापासून हेच दोन मित्र पक्ष एकमेका विरोधाचे कट्टर विरोधक झाले असल्याचे समजत आहे.

कधीकाळी भाजप-शिवसेना हे मित्रपक्ष एकमेकाच्या हातात हात घालून सत्तेमध्ये आले होते. मात्र भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाला योग्य पद्धतीची भागीदारी अथवा राजकीय वर्तुळातील सन्मानपूर्वक वागणूक दिली नसल्याचे समजत होते.

याबाबत या अगोदरही शिवसेनेच्या लोकांनी शिवसैनिकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महा विकास आघाडी अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष यांचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पदावर विराजमान आहेत.

तर कधीकाळी शिवसेना पक्षाचा असलेला मित्र पक्ष म्हणून असलेला भाजप विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. आता हेच दोघे विरोधी पक्ष म्हणून आणि कट्टर विरोधक म्हणून एकमेकांकडे पाहत आहेत. सध्या भाजप पक्ष पुन्हा एकदा शिवसेना पक्षाला आपली मैत्री ऐवजी आता कट्टरता दाखवून देत आहे. त्यामुळे जर कदाचित शिवसेना पक्ष पुन्हा भाजप बरोबर जाईल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असलेली आघाडी तोडेल. मात्र , येणार काळच पुढे काय होईल, हे सांगेल असे वाटते.